पोस्ट्स

आपण_सारे_असुर

इमेज
#रिव्हर्स_स्पिरिचुअलिटी "असुर" वेब सिरीज छान आहे. ह्या सायकोलॉजिकल थ्रीलर मधे मानवी स्वभावाचे सर्व पैलु उलगडून दाखवण्यात आले आहेत. नैतिकता, धर्म, क्षमाशिलता, प्रेम, करुणा, परोपकार, सहिष्णूता ही पवित्र आणि धार्मिक मानली जाणारी मूल्ये खरंतर आपणा सर्वांच्या आत खोलवर दडून बसलेल्या राक्षसी चेहऱ्याला लपवण्यासाठी वरून लावलेले मुखोटे आहेत आणि जेव्हा तुमच्या ह्या खोट्या मूल्यांच्या अहंकाराला डिवचलं जातं तेव्हा हे सगळे मुखोटे गळून पडतात आणि तुमचा राक्षसी चेहरा प्रकट होतो, ही या वेबसिरीजची theme आहे. अध्यात्म म्हणतं की तुमचं मूळ अस्तित्व हे ईश्वरीय असून तुम्ही निर्मळ पवित्र प्रेममय आत्मस्वरूप आहात. आणि अहंकारवश तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडून तुम्ही अपवित्र आचरण करत असता. आणि असुरचं रिव्हर्स अध्यात्म असं म्हणतं की तुमचं मूळ अस्तित्व हे राक्षसी असून तुम्ही हिंसक अपवित्र आणि द्वेषमूलक आहात. पण हे तुमचं असली स्वरूप लपवण्यासाठी तुम्ही पवित्रता आणि चांगुलपणाचा आव आणत असता. अध्यात्माच्या सर्वमान्य विधानांना उलटं टांगून त्यांची चिरफाड करण्यात आली आहे. आणि सत्य नेमकं ह्याच्या विपरीत ...

फिर भी दिल है हिंदुस्थानी

इमेज
  एक मित्र भेटायला आला. म्हणे, तु अध्यात्मात इतकी वर्षे घालवूनही आता त्यावरच टीका करतोस. आसारामसारख्या बुवांना शिव्या घालतोस ते ठीक आहे, पण सगळेच वाईट नसतात रे. मी म्हटलं, एखादं उदाहरण दे जो ह्या क्षेत्रात धुतल्या तांदळाचा आहे. तो बोलला, आचार्य प्रशांत बद्दल तुझं काय मत आहे? तो किती छान गोष्टी सांगतो, वेद उपनिषद सारख्या क्लिष्ट गोष्टी सोप्या करुन सांगतो. भक्ती ज्ञान आणि कर्मयोग सोप्या भाषेत समजावतो. मी म्हटलं, आचार्य प्रशांत बद्दल बोलण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगतो ती नीट ऐक. मग आचार्य प्रशांत बद्दल बोलूयात. एका गावात एक व्यापारी होता. त्याच्या घरी एक म्हैस होती. म्हशीचं दूध तो स्वतः प्यायचा. पण शेणाचं काय करायचं हा प्रश्न त्याला पडायचा. त्याला एक युक्ती सुचली. शेणाला वेगवेगळे आकार देऊन तो खेळणी म्हणून विकू लागला. आपल्या मार्केटिंग स्किल्स वापरून तो गावभर खेळणी विकू लागला. काही वर्ष जोरात चालला त्याचा धंदा. पण शेणाची खेळणी लवकर तुटफूट व्हायची शिवाय आता मार्केट मधे लाकडाची धातूची टिकाऊ खेळणी आली त्यामुळे काही वर्षांनी धंदा मंदावला. व्यापाऱ्याच्या मुलाने मग नवीन शक्कल लढवली. शेणापासू...

दूर के ढोल सुहाने लगे.

इमेज
  दूर के ढोल सुहाने लगे. जे लांब आहे त्याची ओढ अधिक असते. जे जवळ आहे त्याबद्दल ओढ किंवा आकर्षण कमी होत जातं. हा मानवी स्वभाव आहे. मी पहिल्यांदा ऋषिकेशला गेलो होतो तेव्हा वाटलं होतं किती नशीबवान असतील ना इथले रहिवासी. ऋषिकेश सारख्या पवित्र जागी त्यांचं घर आहे. आपण किती लांबून येतो इथं दर्शनाला. ह्यांचं बरं आहे, रोजच तीर्थयात्रा घडते ह्यांना. पण प्रत्यक्षात मात्र तिथं राहणाऱ्या लोकांना त्यात काही थोर वाटत नाही. त्यांना ऋषिकेश व्यतिरिक्त इतर देवस्थानावर जाऊन दर्शन घ्यायची इच्छा असते. "जागृत" देवस्थानावर बाहेरून लांबून येणाऱ्यांचीच संख्या अधिक असते नेहमी. लोकल लोकं क्वचितच त्या मंदिरात जात असतील. जे प्राप्त आहे त्यातून अपेक्षाभंग झाला म्हणजे मग अप्राप्याची ओढ लागते. अप्राप्य गोष्टी जास्त आकर्षक वाटतात. जिथं पेशन्टची गर्दी असते तो डॉक्टर चांगला, जिथं ग्राहकांची रांग असते ते हॉटेल चांगलं, जिथं भक्तांची रेटारेटी जास्त असते तो देव जागृत असं लोकमत असतं. हॉटेलात कितीही घाण असो, पदार्थ कितीही बेचव असो, पण "क्राऊड" आहे म्हणजे ते चांगलंच असणार अशी भावना असते. "इतके सगळे लोक...

sunc cost fallacy

इमेज
  तुम्ही लाख रुपये खर्च करुन एक मशीन विकत घेऊन येता. ती मशीन कपडे धुवून देईल, भांडे घासून देईल, स्वयंपाक करुन देईल अशी जाहिरात तुम्ही बघितलेली असते. मोठ्या थाटामाटात तुम्ही मशीन घरी आणता. पण, जेव्हा तुम्ही तिला ऑन करता तेव्हा ती एकही काम करत नाही. मग तुम्ही कंपनीला तक्रार करता. कंपनी म्हणते मशीनला काम करण्यासाठी एक सॉफ्टवेअर अपग्रेड मारावा लागेल. त्यासाठी 25 हजार रुपये खर्च येईल. तुम्ही ऑलरेडी एक लाख खर्च केलेले असतात. त्यामुळे आता 25 हजार अधिक खर्च करायला काय हरकत आहे म्हणून तुम्ही 25 हजार रुपये आणखी देता. पण तरीही मशीन काम करत नाही. तुम्ही परत कंपनीला तक्रार करता. कंपनी म्हणते तुम्हाला मशीनसाठी एक सपोर्टिव्ह एसेसरी विकत घ्यावी लागेल त्याशिवाय मशीन काम करणार नाही. तुम्ही परत 10 हजार खर्च करता आणि ती accessory घेऊन येता. पण मशीन तरीही काम करत नाही. पण तुम्ही आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार इन्व्हेस्ट केलेले असल्यामुळे ते पैसे वाया जाऊ नयेत म्हणून कंपनी जे जे सांगेल ते करत जाता. तुमची फसवणूक झालीये हे लक्षात येऊनही तुम्ही कंपनीच्या आज्ञा पाळत जाता. कारण तुमचे पैसे वाया जातील ही भीती अस...

सुशिक्षितांच्या_अंधश्रद्धा

इमेज
तेजज्ञान फाउंडेशन ह्या अध्यात्मिक संस्थेत स्वयंसेवक म्हणून सेवा देत असताना मी विदर्भात विविध शहरात जाऊन तिथं शिबीर घ्यायचो. एकदा अमरावतीला शिबीर असताना तिथल्या एका सेविकेने मला आणि माझ्या टीम ला घरी जेवायला आमंत्रित केले. त्या मॅडमचा अमरावतीतल्या उच्चभ्रू वस्तीत बंगला होता. अगदी चकाचक घर. घरात नोकरचाकर. मॅडमचे पती खुप मोठे सरकारी कंत्राटदार होते. मुलं विदेशात शिकायला होती. आम्हाला छान रुचकर पकवान्न खाऊ घातलेत. मला वॉशरूमला जायचं होतं तर मी मॅडमला वॉशरूम कुठाय विचारलं. बैठकीच्या हॉल ला लागूनच किचन होतं अन किचनमधून वॉशरूम कडे जायचा रस्ता होता. मला वॉशरूमकडे जाण्याचा रस्ता दाखवताना मॅडमने तिथल्या चार फरशांकडे बोट दाखवत सांगितलं, "सर ह्या चार फरशांवर पाय न देता थोडंसं वळून जाल वॉशरूमकडे. मला वाटलं फरशी ओली असेल किंवा उखडलेली असेल म्हणून काळजी घेत असणार मॅडम. मी वॉशरूम मधून बाहेर आल्यावर मग त्यांनी मला त्या फरशा निरखून बघायला सांगितलं आणि त्यात कसली आकृती दिसते का ते विचारलं. मी निरीक्षण करत बघितलं काय दिसते का म्हणून. मार्बलच्या फरशा होत्या तर त्यावर वेडं वाकडं काहीतरी दिसलं. मला काह...

सुशिक्षितांच्या_अंधश्रद्धा part 2

इमेज
  समजा उद्या गाडगे बाबा अचानक प्रकटले तर? लोकं त्यांच्या दर्शनाला रांगा लावतील का? गर्दी जमेल का? कुतूहल म्हणून बघ्यांची गर्दी जमली तरी ते त्यांच्या पायावर डोकं ठेवतील का? त्यापेक्षा महत्वाचं, गाडगे बाबा आपल्या पायांवर कुणाला डोकं ठेऊ देतील का? की हाकलून लावतील काठी दाखवून? लोकही तिथंच गर्दी करतात जिथं त्यांना चमत्कारांची आशा असते. गाडगेबाबा चमत्कार करत नाहीत. उलट चमत्कार करण्याचा दावा करणाऱ्यांची खबर घेतात. गाडगेबाबा साफसफाई करतात.. केरकचरा काढून फेकतात.. गावातला.. मनातला. ते म्हणतात, देव भेटासाठी गुरु करा लागत नाही. माह्या कोणी गुरु न्हाई अन मी कोणाचा गुरु न्हाई. काहून की समाजात काही काही लबाड गुरु हायेत, तुमाले पाप पुण्याच्या गोष्टी सांगून भेव दाखोतात. जो गुरु होते त्यालेच भलकसा अहंकार असते, मी अळाणी माणूस हाओ, गावोगाव फिरलो, नवस करणारे अंगात आणणारे लोकं पाह्यले, मनाले तळमळ लागली की आपून करतो, पण हे बरं न्हाई.. लोकाईले शिक्षणाचं महत्व समजलं पाह्यजे.. देवानं अक्कल दिली ते वापराची की नाही वापराची? एक अशिक्षित माणूस, 1876 साली जन्मला. तोच काळ ज्या काळात उठसूठ कुणालाही संत बनवून डोक...

#प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का? (भाग 1)

इमेज
  #प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का ? (भाग 1) उत्तर आहे, "नाही. अजिबात नाही." "द सिक्रेट" ह्या पुस्तकाने एक काळ गाजवला होता. असं म्हणण्यापेक्षा हे पुस्तक प्रत्येकाच्याच लाईफमधे कधीतरी एक काळ गाजवत असतं असं म्हणणं अधिक सयुक्तिक राहील. ह्या पुस्तकावर आधारित एक documentary film पण आली होती ती पण एकदम ढासू होती. तुम्ही कल्पना करा एका अप्रतिम जीवनाची.. गाडी बंगला, बँक बॅलन्स, सुंदर बायको, गोंडस लेकरं, विदेश पर्यटन, luxury life. कल्पना करा अर्थात visualize करा. म्हणजे तुम्हाला आयुष्यात जे जे हवंय ते मनःचक्षु समोर चित्रित करा आणि ते "फील" करा.. असं केल्याने तुमची प्रार्थना विश्वाच्या अंतरात्म्यापर्यंत पोचेल आणि आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमची ती प्रार्थना चमत्कारीकरित्या वास्तवात उतरेल. अहाहा! किती छान! ती फिल्म पाहून आणि ते पुस्तक वाचून थोडा वेळ असं वाटायला लागतं जणु काही आपल्याला जादूची छडीच सापडली की काय, किंवा अलादीनचा चिराग सापडला. जसं काही कोणतं दिव्य रहस्य तुमच्या पुढ्यात उलगडलं. जसंकाही कोणत्यातरी दैवी दिव्य चमत्कारीक महाशक्तीने तुम्ह...