पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्याचं कस्टमर केअर सेंटर

इमेज
  गरीब अशिक्षित वर्गातल्या बायकांच्या "अंगात" येतं. सुशिक्षित पैसेवाल्या बायकांना "अवेकनिंग एक्सपीरीयन्स" होत असतात . मुळात आहेत दोन्ही मानसिक विकृतीच. जीवनातल्या समस्यांचं समाधान चुकीच्या ठिकाणी शोधायला गेलात तर तुमची लुबाडणूकच होईल. फॅमिली रिलेशनशिप प्रॉब्लम्स, हेल्थ प्रॉब्लम्स,करिअर मुळे येणारा स्ट्रेस ह्यामुळे आलेली निराशा माणसाला पर्मनंट सोल्युशन्स च्या शोधात भटकायला भाग पाडते. हे तथाकथित "पर्मनंट" सोल्युशन देण्याचा दावा अध्यात्माच्या आडून केला जातो. "अवेकनिंग" "डिवाईन ब्लीस" "एनर्जी हीलिंग" इत्यादी फॅन्सी नावाने हा गोरखधंदा चालतो. ह्याला बळी पडतात सुशिक्षित वर्गातली माणसं. (ह्यात महिलांचं प्रमाण अधिक ) असं असलं तरीही तिथं उपस्थित सगळेच्या सगळेच काही परमेश्वराच्या शोधात आलेले नसतात. बहुतांशी भुरटेच असतात. भारतीय संस्कृतीचे बळी ठरलेले, सेक्स बद्दल मनात कुंठा असलेले, विदेशी बायकांबद्दल कमालीचं आकर्षण असलेले, व्याभिचार तर करायचा परंतु तो धार्मिक वातावरणात करायचा हेतू घेऊन आलेले पापभीरू पुरुष इथं लुंगाळत असतात. अश्या "OY...

कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही!

इमेज
  कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही! कुठल्याही सत्संगात, अध्यात्मिक संस्थेत, आश्रमात जाल तर तिथं तुम्हाला सेवकांची एक भलीमोठी फौज बघायला मिळेल. हे सेवक (volunteers ) म्हणजे एक अशी जमात असते ज्यांचा पूर्णपणे ब्रेनवॉश झालेला असतो. ह्यांनी एक विशिष्ट गणवेश धारण केलेला असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सारखेच भाव असतात. एकसारखी ह्यांची भाषा आणि देहबोली असते. प्रोग्रॅम्ड केलेल्या humanoid robots सारखे हे सोपवलेली कामं करत असतात. एक रोबोट जसा दिलेल्या कमांड नुसार काम करतो अगदी तसंच. कोणताही कल्ट (cult ) चालवण्यात ह्यांची खुप मोठी आणि मोलाची भूमिका असते. ह्यांच्याच श्रमावर सगळा कल्ट ऑपरेट होत असतो. हिटलरनं जसं त्याच्या बाजूने असलेल्या नागरिकांना एकसारखा गणवेश दिला होता, हातात शस्त्रे आणि काही घोषवाक्ये दिली होती अगदी तसेच हे सेवक असतात. फक्त ह्यांच्या हाती शस्त्रांच्या ऐवजी विक्रीसाठी विविध प्रचारसाहित्य असतं. (ह्यांच्या गुरूंनी आदेश दिला तर हे शस्त्रही उचलतात एवढा ह्यांच्या बुद्धीचा ताबा ह्यांनी गुरुच्या हाती सोपवला असतो.) ह्या सेवकांचे प्रकार असतात. फूलटाईम सेवक, पार्ट टाईम सेवक, पगारी सेवक, ...

ईश्वरवादी (आस्तिक ) विरुद्ध निरीश्वरवादी (नास्तिक )

इमेज
  ईश्वरवादी (आस्तिक ) विरुद्ध निरीश्वरवादी (नास्तिक ) हा वाद फार जुना आहे. हे दोन्ही गट आपसात समन्वयाने, वादविवादरहीत जगु शकत नाहीत का? एकाच कुटुंबात दोन सदस्य आस्तिक अन दोन जण नास्तिक असतील तर ते एका घरात गुण्यागोविंदाने राहु शकत नाहीत का? देवावर श्रद्धा असणे किंवा नसणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असला तरीही त्यांच्या विश्वासाचा एकमेकांच्या जगण्यावर बरा वाईट परिणाम होत असतो. समजा, बायको आस्तिक असेल अन नवरा नास्तिक तेव्हा तिथं दोघांमध्ये आपसी समजूतदारपणा नसेल तर रोजचे वाद होऊ शकतात. नवऱ्याला नॉनव्हेज खायची इच्छा झाली, पण नेमकी त्या दिवशी चतुर्थी असेल तर? आता दोघांपैकी एकाला आपल्या comfort चा बळी द्यावा लागेल. आज न खाता उद्याही खाता येईल, हा समंजसपणाचा प्रतिसाद नवऱ्याने द्यावा असं बहुतेकांचं मत इथं राहील. चतुर्थी काही रोज रोज येते का? म्हणून नवऱ्याने आपल्या इच्छेला होल्ड करावं हे सुज्ञपणाचं अन सभ्यपणाचं आहे कुणीही मान्य करेल. पण समजा त्याला एकट्यालाच दरवेळी तडजोड करून माघार घ्यावी लागत असेल तर? किंवा चतुर्थीसारखंच आठवड्यातून पाच दिवस कोणत्या ना कोणत्या देवाच्या वारामुळे नॉनव्हेज खा...

आयुष्याचं कस्टमर केअर सेंटर

इमेज
  आमच्या शहरात एका नावाजलेल्या महाराजांचा कार्यक्रम सुरु आहे. तोच महाराज ज्याच्या कार्यक्रमात रुद्राक्षासाठी चेंगराचेंगरी होऊन माणसं मेली होती. हा कार्यक्रम आमच्याच एरियात असल्याने दुपारी आणि सायंकाळी भयंकर ट्राफिक जाम लागतो. काही रस्ते बंद करुन वाहतूक वळवली जाते. कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी रिक्षे मोटारी आणि बसेस खचाखच भरून जातात. बरीच मंडळी पैदल असते. ह्या गर्दीत पिवळ्या नारंगी शेड्सच्या साड्या नेसून बायकांची भीड खुप जास्त पाहायला मिळते. अधिकांश बहुजन गरीब मध्यमवर्गीय घरातल्या बायका. जीवाचा इतका आटापिटा करत ह्या बायका तिथं गर्दी करायला जातात. काय मिळत असावं त्यांना? एखाद्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरवर तक्रारी-कॉल्सची संख्या वाढली असेल, किंवा त्यांच्या सर्व्हिस सेंटरवर रिपेरिंग आणि रिप्लेसमेंटसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असेल तर ह्याचा असा अर्थ निघतो की ग्राहक प्रॉडक्टला घेऊन संतुष्ट नाहीत. हल्ली कधी नव्हे ते बुवा बाबांच्या सत्संगाना ऊत आलाय. ऑफलाईन ऑनलाईन बाबा, विविध भाषिक बाबा, विविध संप्रदायाचे बाबा, टोणे टोटके सांगणारे बाबा, 'हे खा ते नका खाऊ' सांगणारे बाबा, परची काढून भविष...