प्रेम , करुणा , परोपकार , मदतीची भावना ह्या मला आजकाल सदगुणविकृती आहेत कि काय असं वाटायला लागलं आहे. ह्या मूल्यांचं भारी कौतुक केलं जातं . कारण प्रत्येकाला ह्या गोष्टी हव्या असतात , प्रत्येकाला प्रेम हवं असतं , करूणा हवी असते , मदत हवी असते. पण ती स्वतःतला गुण म्हणून नाही तर इतरांकडून ते अपेक्षित असतं . आपण इतरांकडून जी अपेक्षा करतो ती आपणही इतरांना देण्यासाठी सक्षम आणि तत्पर असलो पाहिजे हे मात्र फार कमी लोकांना उमगतं. आम्हाला बालपणी घरी कोणतीही नैतिक मूल्ये असं बसवून उपदेश करून शिकवली गेली नाहीत. बाबा प्राथमिक शाळेवर शिक्षक होते. तरीही त्यांनी कधीच आम्हाला मोठमोठे भारी शब्द वापरून उपदेश केले नाहीत. पण .. त्यांनी त्यांच्या आचरणातून वागण्याबोलण्यातून ती मूल्ये आमच्यात रुजवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही इतका सायलेंट होता कि ती मूल्ये आमच्यात "रुजायलाच" पाहिजेत असा आग्रह किंवा अशी अपेक्षा त्यांनी केली नाही. ७०-८० च्या दशकातला एका खेड्यातल्या प्राथमिक शाळेवर शिकवणाऱ्या मास्तरला तेव्हा पगारच किती असायचा ? जेमतेम आपलं अन आपल्या कुटुंबाचं पोट भरे...
पोस्ट्स
जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"Mid brain activation" च्या नावाखाली डोळ्यांवर पट्टी बांधून पुस्तक वाचणे, रंग ओळखणे, खेळ खेळणे अशा प्रकारचे अनेक दावे काही जणांकडून केले जातात. पण हे दावे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खोटे आणि फसवणूक करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. Mid Brain Activation म्हणजे काय? Mid Brain Activation ही एक गोंडस संकल्पना आहे जी मुख्यतः मुलांमध्ये "सुप्त शक्ती जागृत करणे", "फोकस वाढवणे", "अलौकिक क्षमता निर्माण करणे" असे दावे करत विकली जाते. यात 'थर्ड आय' किंवा 'pineal gland' सक्रिय करण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. यासाठी संगीत, ध्यान, डोळ्यांवर पट्टी, इत्यादीचा वापर केला जातो. डोळ्यांवर पट्टी बांधून वाचण्याचे प्रयोग – सत्य काय आहे? अनेक प्रकरणांत वैज्ञानिकांनी असे निरीक्षण केले आहे की ही मुले डोळ्यांवर हलकीशी छिद्र असलेली पट्टी लावतात किंवा ती योग्य पद्धतीने घट्ट बांधलेली नसते, त्यामुळे ते थोडं बघू शकतात. डोळ्यांखालून/शेजारून वाचन केले जाते. पूर्वीच शिकवलेले किंवा स्क्रिप्टेड असणे: काहींना आधीच माहिती दिलेली असते की काय विचारले जाणार आहे. प्रशिक्...