सुशिक्षितांच्या_अंधश्रद्धा part 2


 समजा उद्या गाडगे बाबा अचानक प्रकटले तर? लोकं त्यांच्या दर्शनाला रांगा लावतील का? गर्दी जमेल का? कुतूहल म्हणून बघ्यांची गर्दी जमली तरी ते त्यांच्या पायावर डोकं ठेवतील का? त्यापेक्षा महत्वाचं, गाडगे बाबा आपल्या पायांवर कुणाला डोकं ठेऊ देतील का? की हाकलून लावतील काठी दाखवून?

लोकही तिथंच गर्दी करतात जिथं त्यांना चमत्कारांची आशा असते. गाडगेबाबा चमत्कार करत नाहीत. उलट चमत्कार करण्याचा दावा करणाऱ्यांची खबर घेतात. गाडगेबाबा साफसफाई करतात.. केरकचरा काढून फेकतात.. गावातला.. मनातला.
ते म्हणतात, देव भेटासाठी गुरु करा लागत नाही. माह्या कोणी गुरु न्हाई अन मी कोणाचा गुरु न्हाई. काहून की समाजात काही काही लबाड गुरु हायेत, तुमाले पाप पुण्याच्या गोष्टी सांगून भेव दाखोतात. जो गुरु होते त्यालेच भलकसा अहंकार असते, मी अळाणी माणूस हाओ, गावोगाव फिरलो, नवस करणारे अंगात आणणारे लोकं पाह्यले, मनाले तळमळ लागली की आपून करतो, पण हे बरं न्हाई.. लोकाईले शिक्षणाचं महत्व समजलं पाह्यजे.. देवानं अक्कल दिली ते वापराची की नाही वापराची?
एक अशिक्षित माणूस, 1876 साली जन्मला. तोच काळ ज्या काळात उठसूठ कुणालाही संत बनवून डोक्यावर घेण्यासाठी लोकं तत्पर असायचे. खोटे चमत्कार पेरून कुणालाही देवाचा अवतार बनवत होते, त्याकाळी लोकांच्या अज्ञानाचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन हा गाडगे बाबा नावाचा माणूस सहज आपला मठ स्थापन करुन ऐशो आरामात जगु शकला असता. पण त्यांनी विवेकाची मशाल पेटवून लोकांना अंधश्रद्धेतून जागं करण्याचं काम निवडलं. अश्या खऱ्या संतास अभिवादन 🙏🏻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.