दूर के ढोल सुहाने लगे.
दूर के ढोल सुहाने लगे. जे लांब आहे त्याची ओढ अधिक असते. जे जवळ आहे त्याबद्दल ओढ किंवा आकर्षण कमी होत जातं. हा मानवी स्वभाव आहे. मी पहिल्यांदा ऋषिकेशला गेलो होतो तेव्हा वाटलं होतं किती नशीबवान असतील ना इथले रहिवासी. ऋषिकेश सारख्या पवित्र जागी त्यांचं घर आहे. आपण किती लांबून येतो इथं दर्शनाला. ह्यांचं बरं आहे, रोजच तीर्थयात्रा घडते ह्यांना. पण प्रत्यक्षात मात्र तिथं राहणाऱ्या लोकांना त्यात काही थोर वाटत नाही. त्यांना ऋषिकेश व्यतिरिक्त इतर देवस्थानावर जाऊन दर्शन घ्यायची इच्छा असते. "जागृत" देवस्थानावर बाहेरून लांबून येणाऱ्यांचीच संख्या अधिक असते नेहमी. लोकल लोकं क्वचितच त्या मंदिरात जात असतील. जे प्राप्त आहे त्यातून अपेक्षाभंग झाला म्हणजे मग अप्राप्याची ओढ लागते. अप्राप्य गोष्टी जास्त आकर्षक वाटतात. जिथं पेशन्टची गर्दी असते तो डॉक्टर चांगला, जिथं ग्राहकांची रांग असते ते हॉटेल चांगलं, जिथं भक्तांची रेटारेटी जास्त असते तो देव जागृत असं लोकमत असतं. हॉटेलात कितीही घाण असो, पदार्थ कितीही बेचव असो, पण "क्राऊड" आहे म्हणजे ते चांगलंच असणार अशी भावना असते. "इतके सगळे लोक...