पोस्ट्स

सुबह हो गयी मामु

इमेज
2008 मधे भंडारा जिल्ह्यातल्या एका प्रस्तावित आयुर्वेद महाविद्यालयाच्या हॉस्पिटल वर मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. कॉलेजच्या इमारतीचा फक्त आराखडा कागदावर तयार होता. ओपिडी एका भाड्याच्या इमारतीत होती. त्याच इमारतीत माझी राहण्याची व्यवस्था होती. आयुर्वेदिक ओपिडी असल्याने एकही पेशन्ट येत नव्हता त्यामुळे मला काहीही काम नसायचं. फुकटचा पगार काय घ्यायचा म्हणून मी त्याच संस्थेद्वारा संचालित "आशा" कोर्स करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना लेक्चर्स द्यायचो. मला जॉईन होऊन 5 महिनेच झाले होते. एक दिवस अचानक दिल्लीहून CCIM ची इन्स्पेक्शन टीम येऊन धडकली. मी ओपिडीतच बसून होतो. टीम मधे चार जण होते. एक महिला अधिकारी आणि तीन पुरुष. आल्याबरोबर त्यांनी मला IPD म्हणजे आंतररुग्ण विभागाची इमारत दाखवण्याची आज्ञा केली. मी दांदरून गेलो कारण IPD अस्तित्वातच नव्हती. स्टाफ म्हणून आम्ही फक्त पाच जण होतो. मी आणि माझ्या हाताखाली एक अटेंडंट, एक बाबु, एक रिसेप्शनीस्ट मुलगी आणि एक नर्स. "हॉस्पिटल दिखाईये डॉक्टर साहब" हे त्या इन्स्पेक्शन टीम चं वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हॉस्पिटल...

लिव्हइन रिलेशनशिप

इमेज
  लिव्हइन रिलेशनशिप आपण एखाद्या विषयावर "थोडक्यात" आपलं मत व्यक्त करायला बघतो. पण तसं करताना आपण व्यक्त केलेल्या मताचा विपर्यास होण्याची शक्यता असते. विषय गंभीर असेल तर व्यक्त होताना आपल्याला जवाबदारीने लिहावं लागतं. शेवटी आपण कितीही समतोल साधायचा प्रयत्न केला तरी वाचकांपैकी बरेच जण त्यांच्या सोयीचा अर्थ घेऊन मोकळे होतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या मतांना तसं फारसे लोक महत्व देत नसले तरीही आपले विचार वाचणारे मोजके मित्र भ्रमित होण्याचा दोष आपल्यावर येऊ शकतो. आपली मतं आपल्याला आलेल्या अनुभवावर आणि त्यातून आपण घेतलेल्या बोधावर तयार झालेली असतात. प्रत्येकाची आकलन क्षमता कमी अधिक असल्याने एकाच विषयाबद्दल मत मतांतरे असु शकतात. प्रत्येकाला आपलं मत योग्य वाटत असलं तरीही ते त्रुटीयुक्त असु शकते ही शक्यता डोक्यात असायला हवी. व्यक्त होणं गरजेचं आहेच, पण आपलं मत कुठंतरी चुकतंय हे लक्षात आणून देणारे मित्र आपल्या यादीत असले तर ते तुम्हाला करेक्ट करतात. असे मित्र असणं आपल्यासाठी हिताचं असतं. तेव्हा त्यांनी सुचवलेल्या गोष्टींनाही महत्व देण्याचा गुण अंगी असायला हवा. अश्या विषयांवर आपसात...

युटोपियन स्वप्नांचं सुपर मार्केट

इमेज
  सर थॉमस मोर ह्या फिलोसॉफर - लेखकानं सोळाव्या शतकात एक "युटोपिया" नावाचं पुस्तक लिहिलं. युटोपिया (Utopia) म्हणजे एक कल्पनेतला देश किंवा एक काल्पनिक बेट जे आपण राहतो त्या दु:खमय आणि "imperfect" जगापासून अगदी भिन्न आहे. अर्थातच हे "युटोपिया" नावाचं स्थळ अस्तित्वात नाही तरीदेखील ह्या युटोपिया चं वर्णन करताना म्हटलं आहे कि असं जग जिथं दुःख, भय, चिंता , द्वेष, इर्ष्या, मोह, आजार, गरिबी, गुन्हेगारी, पारतंत्र्य, विरह आणि विवंचनेचा लवलेशही नाही. म्हणजेच एक असं विश्व जिथं फक्त सुख आनंद आणि हर्ष - उल्हासाचं साम्राज्य आहे. युटोपियात वास्तव्यास असलेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव प्राणी पक्षी हे अप्रतिम सौंदर्याने नटलेले असून तिथं उन्ह वारा पाऊस हे ऋतू सुद्धा अगदी आपल्या सुंदरतम अवस्थेत आणि एका लयीत संचालित होत असतात. रसरशीत आणि अवीट अश्या स्वादाने भरपूर अशी विविध फळे झाडांवर लगडलेली आहेत आणि स्वच्छ शीतल मधुर पाण्याचे ओढे जिकडे तिकडे वाहत आहेत. युटोपिया मधे कुणाचं कुणाशी वैर नसल्याने कुणाची भीती नाही कि इर्ष्या नाही. प्रत्येका साठी प्रत्येक सुख विपुल प्रमाणात उपलब...

बुलाती हैं मगर

इमेज
  नटसम्राट भाऊराव काका व्हेंटिलेटर वर असतात. इकडे हॉस्पिटल बाहेर पत्रकार आणि भाऊरावांचे हितचिंतक टपरीवर चहाचे घोट घेत आपसात चर्चा करत असतात. सर्वांनां काकांची काळजी लागलेली असते. आतमधे काय चाललंय ह्याबद्दल कुणीच काही सांगत नसल्याने आणि अफवांना ऊत आल्याने गावात संभ्रम पसरलेला असतो. रेडिओ वर राहत इंदोरी च्या शायरीचा कार्यक्रम सुरु असतो. आपल्या अनोख्या शैलीत राहत साहब शेर "इर्षाद" करत असतात. वो बुलाती हैं मगर जाने का नइ ये दुनिया हैं उधर जाने का नइ वबा फैली हुई है हर तरफ़ अभी माहौल मर जाने का नइं तेवढ्यात हॉस्पिटल चे सिनियर डॉक्टर्स बाहेर येतात. सगळे पत्रकार त्यांच्याकडे धाव घेतात. प्रश्नांची सरबत्ती सुरु होण्याआधीच डॉक्टर्स भाऊरावांच्या मृत्युची बातमी कन्फर्म करतात. ते ऐकून गर्दीत उभा असलेला एक युवक ढसाढसा रडायला लागतो. पत्रकारांना वाटतं हा बहुतेक भाऊरावांचा कुणी निकटवर्तीय असावा. सगळे जण त्याच्या तोंडासमोर आपापले माईक नेऊन त्याला विचारतात तुम्ही कोण आहात आणि काकांच्या जाण्याने तुम्हाला इतकं दुःख का बरं झालं? त्यावर तो युवक म्हणतो, माझं तसं त्यांच्याशी काही नातं नाही, खरं सां...

ध्यान

इमेज
  पलट! तेरा ध्यान किधर हैं? "ध्यान" ह्या विषयावर मी लिहावं असं माझ्या काही फेसबुक मित्रांनी सुचवलं होतं. ह्या विषयावर इंटरनेट वर भरपूर सामग्री उपलब्ध असल्याने ध्यान म्हणजे काय हे मी परत सांगायची गरज मला वाटत नव्हती. "ध्यान" शिकवणाऱ्या अनेक संस्था आणि योगगुरू मार्केट मधे उपलब्ध आहेत. ज्याला जे पटतं किंवा ज्याला जे सोयीचं वाटतं तो ते ध्यान शिकतो आणि त्याची प्रॅक्टिस करतो. ध्यानाची व्याख्या बघतो म्हटलं तर जवळपास सर्वांनी थोड्याफार फरकाने सारखीच केलेली दिसते. पण ध्यानाचे विधी शेकडो प्रकारचे आहेत. तसेच ध्यानाचे उद्दिष्ट आणि ध्यानामुळे होणारे लाभ वेगवेगळे सांगितल्या गेले आहेत. ध्यानाचा सरळ सोपा अर्थ होतो एखाद्या वस्तुवर मन एकाग्र करणे. एकाग्रता म्हणजे ध्यान अशी वरवर व्याख्या करता येईल. पण ध्यानाला केवळ "एकाग्रता" म्हटलं कि लगेच काहीजण त्यावर आक्षेप घेतात व म्हणतात कि ध्यान म्हणजे नुसती एकाग्रता नसून ती मनाची त्याहीपेक्षा प्रगाढ अवस्था होय. "अवस्था" ह्या शब्दावरही काहीजण आक्षेप घेऊन म्हणतात कि ध्यान ही अवस्था नसून ती प्रक्रिया (process ) आहॆ. अष्टांग यो...

पुस्तक

इमेज
  मला अजूनही आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी त्या पुस्तकांपैकी शंभरेक तरी पुस्तकं अंगणात रचून त्यावर घासलेट ओतून पेटवून दिली होती. माझ्या आईला ते बघून धक्का बसला होता. तिला वाटलं मी वेडा झालो कि काय? ज्या पुस्तकांवर मी जीवापाड प्रेम केलं त्या पुस्तकांची मीच होळी करताना बघणं तिला झेपलं नाही. »≈«»≈«»≈»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«» "पुस्तकं माणसाचे मित्र आहेत" असं म्हटल्या जातं. ते खरं आहे परंतु काही मित्र फसवे असतात, काही मित्र नकली असतात, काही मित्र मित्राच्या वेषातले शत्रु असतात हे मात्र आपण लक्षात घेत नाही. माझ्याही जीवनात पुस्तकरूपी अनेक मित्र आलेत. त्यांनी माझं मनोरंजन केलं. मला खोट्या का होईना आशा दाखवल्या स्वप्ने दाखवली. 2004 ते 2014 ह्या काळात मी शेकडो पुस्तकं वाचली. शेकडो पुस्तकं माझ्या घरी शेल्फ मधे संग्रहित होती. परंतु त्यातली अधिकांश पुस्तकं अध्यात्म आणि स्वविकास ह्या विषयावर होती. अध्यात्म आणि स्वविकास ह्या विषयातली फ्लॅगशिप मानली जाणारी पुस्तकं माझ्याकडे होती. हे सगळं कशासाठी चाललं होतं? कोणती परीक्षा पास करायची होती मला जो इतका सखोल अभ्यास करत होतो मी? मला हवा होता आत्...

सिम्प

इमेज
  Simp म्हणजे काय भानगड आहे? जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे.. देते ना अगर साथ तो मर जाते हम कभी के पूरे हुये हैं आपसे अरमान जिंदगी के हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे मस्तच आहे न हे गाणं? मुकेश च्या आवाजातलं हे सुपरहिट गाणं तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. गाणं तर तसं अत्यंत रोमँटिक आहे पण ह्या गाण्यातल्या लिरिक्स ची चिकित्सा केल्यास आणखी एक अर्थ ह्यातून निघतो. "सिम्प" हा एक इंटरनेट स्लँग आहे ज्याचा अर्थ होतो भोळसट व्यक्ती. एखाद्या व्यक्तीबद्दल अतीप्रमाणात म्हणजे आवश्यकतेपेक्षा खुप अधिक प्रेम आणि अटेंशन किंवा अफेक्शन (आपुलकी ) दाखवणारी व्यक्ती. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही प्रेम आपुलकी जिव्हाळा पब्लिकली दाखवत असता त्या व्यक्तीला मात्र तुमच्याबद्दल फारशी सिम्पथी किंवा प्रेम नसतं. म्हणजे असं समजा कि तुमच्याकडून हजार रुपये दिले जात आहेत पण मोबदल्यात ती व्यक्ती तुम्हाला दहाच रुपये देत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक "सिम्प" तुम्ही बघितले असतील. किंवा आयुष्यात एकदा तरी तुम्ही स्वतः अश्या प्रका...