सुबह हो गयी मामु


😉
2008 मधे भंडारा जिल्ह्यातल्या एका प्रस्तावित आयुर्वेद महाविद्यालयाच्या हॉस्पिटल वर मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. कॉलेजच्या इमारतीचा फक्त आराखडा कागदावर तयार होता. ओपिडी एका भाड्याच्या इमारतीत होती. त्याच इमारतीत माझी राहण्याची व्यवस्था होती. आयुर्वेदिक ओपिडी असल्याने एकही पेशन्ट येत नव्हता त्यामुळे मला काहीही काम नसायचं. फुकटचा पगार काय घ्यायचा म्हणून मी त्याच संस्थेद्वारा संचालित "आशा" कोर्स करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना लेक्चर्स द्यायचो.
मला जॉईन होऊन 5 महिनेच झाले होते. एक दिवस अचानक दिल्लीहून CCIM ची इन्स्पेक्शन टीम येऊन धडकली. मी ओपिडीतच बसून होतो. टीम मधे चार जण होते. एक महिला अधिकारी आणि तीन पुरुष. आल्याबरोबर त्यांनी मला IPD म्हणजे आंतररुग्ण विभागाची इमारत दाखवण्याची आज्ञा केली. मी दांदरून गेलो 😟😟 कारण IPD अस्तित्वातच नव्हती.😀😀
स्टाफ म्हणून आम्ही फक्त पाच जण होतो. मी आणि माझ्या हाताखाली एक अटेंडंट, एक बाबु, एक रिसेप्शनीस्ट मुलगी आणि एक नर्स. "हॉस्पिटल दिखाईये डॉक्टर साहब" हे त्या इन्स्पेक्शन टीम चं वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हॉस्पिटल ची इमारत अस्तित्वातच नाही तर आता काय घंटा दाखवू ह्यांना? 😀
मी मनातल्या मनात हिम्मत जुळवली आणि विचार केला, जास्तीत जास्त काय होईल? आपली नोकरी जाईल. जाऊ दे. पण घाबरायचं कशाला? आपण तर आपली नोकरी करतोय आपण थोडी काही फ्रॉड केलं? आपला संस्थाचालक बघुन घेईल काय करायचं ते.
मी लगेच संस्थाचालकाला फोन करुन खबर कळवली. त्याचीही तिकडे वीतभर फाटली. तो त्यावेळी नागपुरात होता. आधीच रखडलेल्या कॉलेज च्या प्रोजेक्ट मुळे तो कर्जबाजारी झालेला होता बिचारा. आता टीम आलीच आहे तर परत पैसे घेऊन जाणार ह्या विचारानंच त्याच्या छातीत धडकी भरली. मी विचारलं "आता काय करु साहेब?" संस्थाचालक बोलले, "तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बघतो काय करायचं ते. फोन द्या बरं त्या मादरचोघांना." 😝
मी त्या टीम मधल्या एका "माचो" ला फोन दिला. तिकडून साहेब काय बोलले ते मला माहित नाही पण फोन ठेवताच टीम मधले साहेब म्हणाले, "अच्छा डॉक्टर साहब अभी हम लोग नागपूर जाकर होटल में आराम करते हैं, कल मॉर्निंग में आकर इन्स्पेक्शन करेंगे."
माझ्या थोडा जीवात जीव आला. पण म्हटलं उद्या तरी काय केईएम हॉस्पिटल ची इमारत दाखवू ह्यांना?? टीम नागपूर ला निघून गेली आणि अर्ध्या तासातच आमच्याच संस्थेच्या माध्यमिक शाळेवर काम करणारे शिक्षक आणि अक्खा स्टाफ तिथं येऊन धडकला. सोबत ट्रॅक्टर ट्रॉली सुद्धा घेऊन आले होते. 😀 त्यांनी मला कोणताच त्रास न होऊ देता स्वतःच स्टोर रूम उघडून त्यातले घड्या करुन ठेवलेले कॉट, बेड्स, बेडशीट्स, खुर्च्या टेबल आणि सलाईन चे स्टॅन्ड, औषधंचे बॉक्सेस, आणि हॉस्पिटल चं बोर्ड ट्रॉलीत चढवलं. आणि मला बोलले, "डॉक्टर साहेब तुम्ही फक्त आमच्या सोबत चला आणि आम्हाला थोडं गाईड करा."
"जायचं कुठे आहे?" असा फालतु प्रश्न न विचारता मी मुकाट्यानं आपली गाडी घेऊन त्यांच्या मागे मागे निघालो. पोचलो तो थेट एका कॉन्व्हेंट च्या इमारती वर. त्या इमारतीत लहान मुलांची शाळा भरलेली होती. आमच्या सोबतचे मास्तर तिथल्या मुख्याध्यापिकेशी काहीतरी बोलले आणि 5 मिनटातच शाळा सुटली 😀 दोन दिवस सुट्ट्या म्हणून पोरंही खुश होऊन पाय लावून पळाली. 😀
आता सुरु झाला खरा खेळ. आमची टीम वर्गखोल्यामध्ये घुसली. डेस्क बेंच बाहेर काढलेत. आणि दवाखान्याचं फर्निचर त्या खोल्यांमध्ये सेट केलं. फक्त कोणता रुग्ण विभाग कोणत्या खोलीत "मांडायचा" एवढंच मार्गदर्शन त्यांनी माझ्याकडून घेतलं. बाकी ते सगळे ह्या कामात एक्सपर्ट असल्यासारखे धडाधड सगळं सेट करत होते. रात्री 8 वाजेपर्यंत सगळा सेट लावून झाला. आता ती शाळा हॉस्पिटलच्या इमारतीत ट्रान्सफॉर्म झाली होती 😀 मी आ वासून तो सगळा प्रकार बघत होतो. रात्री 9 वाजता मला त्या मास्तरनं रूम वर जाऊन निश्चिन्त झोपायची "आज्ञा" वजा रिकवेस्ट केली. मी म्हटलं हॉस्पिटल तर रेडी झालं आता पेशन्ट कुठून आणणार?
मास्तर बोलले, " तुम्ही काळजी नका करु पेशन्टही येतील. " 😀
दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बघतो तर काय पेशन्ट तर बेडवर झोपलेले होतेच पण सात आठ डॉक्टर्स मस्तपैकी अप्रॉन वगैरे नेसून आपापल्या टेबल वर विराजमान झालेले होते. मी म्हटलं डॉक्टर्स पण नकली आहेत कि काय? पण त्यातले दोन माझ्या ओळखीतले निघाले. ते सगळे "on paper" तिथं रुजू असलेले डॉक्टर्स होते.
सकाळी 11 वाजता इन्स्पेक्शन टीम आली. आल्याबरोबर त्यातल्या एका खडूस चेहऱ्याच्या साहेबानं माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हटलं, "और मुन्नाभाई! निंद हुई कि नहीं आपकी? या रातभर सेट लगाने में ही व्यस्त थे? हम लोग तो भाई बढिया सोये थे, आपके नागपूर में हॉटेल्स बडे अच्छे हैं."
त्याचा फ्रेंडली बिहेवीअर बघून मी समजून गेलो आमच्या संस्थाचालक साहेबांनी त्यांची मस्त खातीरदारी केली रात्री.
इन्स्पेक्शन "केल्यासारखं" करुन ते लोक दिल्लीला निघून गेले.
नंतर आमच्या साहेबांच्या मुखातून त्या टीमला उद्देशून शंभरेक शिव्या ऐकल्या तेव्हा माहित झालं कि भरपूर "आंदण" घेऊन गेलेत ते.
मोरबी घटने नंतर आपल्या फेकूशेठ च्या हॉस्पिटल दौऱ्याचं इव्हेंट मधे रूपांतर कसं झालं ह्याचे व्हिडीओज बघितल्यावर हे आठवलं म्हणून लिहिलं.
~डॉ विजय रणदिवे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे मृत्युपत्र.