सिम्प
Simp म्हणजे काय भानगड आहे?
जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे
तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे..
देते ना अगर साथ तो मर जाते हम कभी के
हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे
तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे
मस्तच आहे न हे गाणं?
मुकेश च्या आवाजातलं हे सुपरहिट गाणं तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. गाणं तर तसं अत्यंत रोमँटिक आहे पण ह्या गाण्यातल्या लिरिक्स ची चिकित्सा केल्यास आणखी एक अर्थ ह्यातून निघतो.
"सिम्प" हा एक इंटरनेट स्लँग आहे ज्याचा अर्थ होतो भोळसट व्यक्ती.
एखाद्या व्यक्तीबद्दल अतीप्रमाणात म्हणजे आवश्यकतेपेक्षा खुप अधिक प्रेम आणि अटेंशन किंवा अफेक्शन (आपुलकी ) दाखवणारी व्यक्ती. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही प्रेम आपुलकी जिव्हाळा पब्लिकली दाखवत असता त्या व्यक्तीला
मात्र तुमच्याबद्दल फारशी सिम्पथी किंवा प्रेम नसतं. म्हणजे असं समजा कि तुमच्याकडून हजार रुपये दिले जात आहेत पण मोबदल्यात ती व्यक्ती तुम्हाला दहाच रुपये देत आहे.
आपल्या आजूबाजूला अनेक "सिम्प" तुम्ही बघितले असतील. किंवा आयुष्यात एकदा तरी तुम्ही स्वतः अश्या प्रकारचं प्रेम केलं असेल. प्रेम, जिव्हाळा, काळजी ह्या खुप सुंदर गोष्टी आहेत. पण त्या जर एकतर्फी असतील तर मग त्या रिलेशनशिपचं स्वरूप प्रियकर आणि प्रेयसी असं न उरता "स्वामी आणि दास" असं होऊन जातं. आता तुम्ही समोरच्या व्यक्तीचा प्रियकर किंवा प्रेयसी नसता, तुम्ही त्या व्यक्तीचे गुलाम झालेले असता. तुम्ही तिच्यासाठी काहीही करायला तयार आहात ह्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ती व्यक्ती मग तुम्हाला बोटावर नाचवते. तिच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी किंवा तिच्या एका कटाक्षा साठी तुम्ही आस लावून दिवसभर बसलेले असता आणि मग सायंकाळी तुमच्याकडं प्रेमाचा एक शब्द भिरकावला कि तुम्ही खुपच खुश होऊन शेपूट हलवता आणि मग दुसऱ्या दिवशी परत तितक्याच जोमाने त्या व्यक्तीची गुलामी करायला तत्पर असता ही गोष्ट त्या व्यक्तीने चांगली हेरलेली असते. आणि त्याच गोष्टीचा फायदा तुम्हाला नियंत्रित (manipulate ) करण्यासाठी ती करत असते.
"बाबु" "शोना" "पिल्लु" तु फक्त हो म्हण, मग बघ मी तुझ्यासाठी काय करुन दाखवतो. प्लिज प्लिज प्लिज माझं प्रेम स्विकार कर ना.. मी तुला हात जोडतो.. पाया पडतो.. मी तुझ्याशिवाय जगु शकणार नाही रे माझ्या पिल्लु.. प्लिज मला सोडून जाऊ नकोस प्लिज प्लिज प्लिज.
तु म्हणशील तसं मी करीन.. तु म्हणशील तसा मी वागेन.. तु म्हणशील ते काम करीन.. तु म्हणशील तिथं आपण राहू.. पण प्लिज प्लिज प्लिज माझ्यावर प्रेम कर ना.. प्लिज.
हे असं वागणं म्हणजे टिपिकल सिम्प बेहेवीअर म्हटल्या जातं. तिच्या / त्याच्यासाठी कायपण!
मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा
तु बोलेगी तो तेरा पल्लू बन जाऊंगा
माल्यालम होगी तो मल्लू बन जाऊंगा
तेलगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा
तु बनायेगी तो उल्लू बन जाऊंगा
म्हणजे एकंदरीत प्रेमात उल्लू बनण्याची तयारी असणं म्हणजे "सिम्प" बनणं. समोरच्या व्यक्तीचं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असणं, म्हणजे अगदी लाचार आणि दीन होऊन प्रेमाची याचना करणं हे दर्शवतं कि तुम्ही प्रेमी नाही तर सिम्प झाला आहात. एखाद्या व्यक्तीचं प्रेम मिळवण्यासाठी आपला आत्मसन्मान आपली प्रतिष्ठा पणाला लावणं म्हणजे simp behaviour. पण प्रेम हे असं मिळवता येत नसतं. समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम नसेलच तर तुम्ही ते उत्पन्न करू शकत नाही. ती व्यक्ती तुमच्या अश्या simp behaviour चा फायदा घेऊन तुम्हाला manipulate मात्र करु शकते. दिवसभर एखाद्या कुत्र्याला कितीही लाथाडा पण सायंकाळी त्याला एक बिस्कीट फेकून मारलं कि तो शेपूट हलवत जवळ येतोच हे त्या व्यक्तीने हेरलेलं असतं. मग ती तिच्या इच्छा पुर्ण करुन घेण्यासाठी तुमचा वापर करते, तिचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तुमचा उपयोग punch bag सारखा करते. तुमच्या जीवनाचे सगळे सूत्र नकळत तुम्ही त्या व्यक्तीच्या हाती देऊन आयुष्यभर मग एक कठपुतळी बनून जगण्यास मजबूर होता.
प्रेम ही एक सहज सुखद भावना आहे. प्रेमाचा अर्थ होतो स्वातंत्र्य. समोरच्या व्यक्तीला तिच्या मर्जीने जगु देणं आणि स्वतःही तसं जगणं आणि तरीही एकमेकांबद्दल विश्वास आदर आणि जिव्हाळा असणं म्हणजे प्रेम.
पण जेव्हा तुमच्या ह्या प्रेमाचा विकृत अतिरेक होतो तेव्हा तुमची मानसिक सामाजिक आणि आर्थिक बरबादी सुरु झाली असं समजा. प्रेमात भावनांची परिपक्वता हवी, अतिरेक नको. अतिरेक झाला कि मग तुमचा सिम्प व्हायला लागतो.
त्या व्यक्तीच्या विचारांनी तुमच्या मन मस्तीष्काचा संपूर्ण ताबा घेतला असेल.
त्या व्यक्तीमुळे तुमचं सामाजिक आर्थिक आणि मानसिक गणित डगमगलं असेल.
तिच्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंब मित्र आणि व्यवसायाकडेच नाहीतर तुमच्या शारीरिक स्वास्थ्यकडेही दुर्लक्ष करत असाल.
तिच्यासाठी झुरुन स्वतःशी विध्वंसक वागत असाल उदाहरणार्थ उपाशी राहणे, पडून राहणे, हातावर चाकूने नाव कोरणे इत्यादी तर लक्षात ठेवा तुम्ही सिम्प झाला आहात किंवा होण्याच्या मार्गावर आहात.
तुम्ही "सिम्प" तर होत नाही आहात ना?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा