पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओशो

इमेज
ओशो सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काय लिहावं हा पेच पडतो. ओशो एका पोस्टमधे आटोपता येत नाही. त्याला एका लेखात व्यक्त करता येत नाही. तरीही फेसबुकवर लिहितांना जास्त पाल्हाळ लावून चालत नाही. मोजक्या शब्दांत व्यक्त होणं ही इथली अपरिहार्यता असते. मी ओशो हे नाव फार उशीरा म्हणजे दहावीत असताना वगैरे ऐकलं. पण त्याआधी रजनीश हे नाव माहित होतं. 1990 मधे रजनीश चा मृत्यु झाला. तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. म्हणजे तिसरीत असणार. आमच्या घरासमोर गावातल्या डॉक्टरचं घर होतं. त्या डॉक्टरची बायको रजनीशची निकट शिष्या होती. लग्नापूर्वी रजनीश च्या नादी लागून तीनं संन्यास घेतला होता म्हणे, त्याचा नाद सुटावा म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न मुद्दाम एका छोट्याश्या खेड्यात एका डॉक्टरशी लावून दिलं होतं, अशी गावात चर्चा होती. विशेष म्हणजे ती बाई मनोरुग्ण म्हणून गावात विख्यात होती. तिचा स्वभाव फारच मूडी होता. ती कधी फारच प्रेमळ वागायची तर लगेच मूड बदलला कि भयानक भांडण करायची. त्या दोघा नवरा बायकोची भांडणं आम्ही मुलं बरेचदा मनोरंजन म्हणून बघायला जायचो. 90-91 चा काळ असेल. रजनीश चा मृत्यु झाल्याची बातमी आमच्या गावापर्यं...

ध्यानी-मनी

इमेज
“ध्यानी-मनी” नावाचा एक मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकर आणि अश्विनी भावेंनी अभिनय केला आहे. चित्रपटाचा प्लॉट असा आहे कि सदा आणि शालिनी हे नवरा बायको असतात. सदा हा एका रिसॉर्ट चा मॅनेजर असतो. त्यामुळे ते शहरापासून लांब एका शांत ठिकाणी वास्तव्यास असतात. शालिनी "स्किझोफ्रेनिया" ह्या मानसिक आजाराची पेशन्ट असते. त्यांना एक मुलगा असतो - मोहित. पण हा मुलगा खराखुरा नसून काल्पनिक असतो. शालिनीच्या मनाचा भ्रम असतो . त्या मुलाला ती टिफिन बनवून देते , त्याचं शाळेचं दफ्तर रेडी करून देते, त्याचा अभ्यास घेते आणि त्याला कधी कधी रागावते सुद्धा. मोहित अस्तित्वातच नसतो तरीदेखील तो शालिनीच्या काल्पनिक दुनियेत जिवंत असतो. मोहित खराखुरा नाही हे सदाला म्हणजे शालिनीच्या नवऱ्याला माहित असतं, पण त्याला सत्य माहित असूनही तो तिचा भ्रम तसाच राहू देतो आणि तोही ह्या लुटुपुटुच्या काल्पनिक मायलेकाच्या खेळात शामिल होतो. कारण त्याला शालिनीचा भ्रम तोडून तिच्या भावना दुखवायच्या नसतात. ती तिच्या काल्पनिक मुलासोबत खूप आनंदी असते, तिच्या आनंदावर विरजण नको म्हणून सदा देखील तिच्या ह्या भ्रमाला खतपाणी घालतो. पण पुढे च...

मतलबी बन जा जरा मतलबी

  मतलबी बन जा जरा मतलबी दुनिया कि सुनता हैं तु खुद कि भी सुन ले कभी... (लेखक: डॉ. विजय रणदिवे ) डिस्क्लेमर आणि चेतावणी : पोस्ट जरा ( नाही थोडी जास्तच ) लांबलचक आहे. त्यामुळे आधीच सांगतो, घाईगडबडीत वाचु नका. data ऑफ करुन वाचा म्हणजे मधातच कुणी मेसेज करुन डिस्टर्ब् करणार नाही. पोस्ट वाचून तुमच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला अश्लील वाटु शकतील असे काही शब्द वापरण्यात आले आहेत. तुम्ही parents असाल, फारच सभ्य असाल, धार्मिक असाल तर तुमच्याही भावना दुखू शकतात त्यामुळे आपल्या जवाबदारी वर पोस्ट वाचावी. अन्यथा स्क्रोल करुन खाली जा आणि कच्चा बदाम वाला रील बघा. तर आजची पोस्ट anxiety (एंझायटी / तणाव) ह्या विषयावर आधारित आहे. तुमच्या जीवनाशी सबंधित विषय आहे. बरेच मुद्दे तुम्हाला पटतील. पुर्ण पोस्ट वाचु शकलात तर नक्कीच तुमच्या फायद्याचं राहील ह्याची गॅरंटी देतो. तुम्हाला माहित आहे का, कि आपल्यापैकी बरेच जण प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. आणि काहीजण तर अशा तणावाखाली आहेत कि त्यांना त्या तणावाची जाणीव सुद्धा नाही. जगातल्या लोकसंख्ये पैकी 4 ते 5 टक्के लोकं वेगवेगळ्या anxiety disorde...

चार्वाक

इमेज
  चार्वाक अभी जिंदा हैं, वो झूकेगा नहीं स्साला! महाभारताचं युद्ध जिंकून आलेल्या पांडवांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून मोठ्ठा यज्ञ समारंभ आयोजित केला. हजारो ब्राम्हणांना आमंत्रित करुन त्यांना धन धान्य आणि गाय दान करण्याचं ठरवलं. समारंभात दुरून दुरून पंडित पुरोहित शामिल झालेत. यज्ञाला सुरुवात होणार तोच त्यातला एक ब्राम्हण उठून उभा होतो आणि थेट युधिष्ठिराला प्रश्न विचारायला सुरवात करतो. "युधिष्ठिरा, तु हा भव्यदिव्य समारंभ कशासाठी आयोजित केला?" युधिष्ठिर म्हणतो, "कारण आम्ही महायुद्ध जिंकून आलोय म्हणून " "आपल्याच भावांना चुलत्यांना मारून आणि त्यासाठी आपल्याच राज्यातल्या हजारो सैन्यांचं बलिदान देऊन, हजारो लहान मुलांना अनाथ करुन, बायकांना विधवा करुन आणि अनेक माता पित्यांना निसंतान करुन तु "विजयी" झालायस असं वाटतं तुला?" त्या ब्राम्हणाचा दुसरा प्रश्न. हा प्रश्न ऐकून युधिष्ठिराचा चेहरा पडला, कारण युधिष्ठिर हा दयाळू आणि विचारी पुरुष म्हणून प्रसिद्ध होता. न्यायप्रिय अशा युधिष्ठिराला त्या प्रश्नानं असहज केलं हे तिथं बसलेल्या इतर ब्राम्हणांच्या लक्षात आ...

आचार्य प्रशांत

इमेज
  एक नवीन "बाबा" आणि एक नवा "कल्ट" उदयास येत आहे. हा आचार्य प्रशांत (त्रिपाठी ). ६-७ वर्षांपूर्वी हा नुकताच बाबागिरी व्यवसायात आलेला होता. तेव्हा मी ऋषिकेश ला गेलेलो असताना हा कित्येकदा गंगेकाठी फिरताना किंवा त्याच्या दोन चार पिटठू शिष्यांना घेऊन बसलेला दिसायचा. आता हा चांगलाच नावारूपास आला आहे. तरुण वर्ग ह्याला मोठ्या प्रमाणात फॉलो करतो. कारण ह्याची विद्रोही व्याख्यान शैली. आजच्या युवा वर्गाच्या मनात चाललेली करिअर आणि रिलेशनशिप बद्दलची घालमेल - घुसमट ह्यानं चांगली हेरली आहे आणि त्यावर भाष्य करण्याची एक प्रभावी पद्धत विकसित केली आहे. तर हा IIT IIM चा विद्यार्थी असून खाजगी कंपन्यात मोठमोठ्या पोस्ट वर काम केलेला अधिकारी होता. काही अफवा अश्या आहेत की हा प्रशासकीय अधिकारी सुद्धा राहिलेला आहे ( पण ह्याची पुष्टी करण्यासाठी पुरावे मला सापडले नाहीत ) ह्याचे आई वडील दोघेहि प्रशासकीय अधिकारी होते. ह्यानं सुद्धा आयएएस अधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. ह्याला "अध्यात्मिक गुरु" म्हणून डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांनी थोडं डोकं ठिकाणावर ठेऊन विचार करणं आवश्यक आहे की हा ...

सुखी माणसाचा सदरा

इमेज
एक होता राजा, एक होती राणी. राजाचं राणी वर खुप प्रेम होतं परंतु राणी ला कधीच त्याच्या प्रेमावर विश्वास बसत नव्हता. राणी ला सतत वाटायचं कि राजा कधीही माझ्याशी दगा करून दुसरी राणी घेऊन येईल. राजा तिच्यावर खरं प्रेम करायचा, तिची काळजी घ्यायचा, ती खुश राहावी यासाठी गाणी म्हणायचा, जोक्स ऐकवायचा, नाचून दाखवायचा. पण राणी काही केल्या खुश होईना. काही केलं तरी राणी खुश होत नसल्याचं बघुन राजा खिन्न व्हायचा, उदास व्हायचा. त्याला उदास बघुन मंत्री दुःखी व्हायचे. एका मंत्र्यानं राजाला सल्ला दिला, दूर पहाडावर एक महाराज आहेत ते सुखाचा मार्ग दाखवतात. राजा निघाला त्या महाराजाची भेट घ्यायला. महाराज म्हणाले, " मी तुला सुखाचा उपाय सांगु शकतो पण तुला एक काम करावं लागेल." राजा पराक्रमी होता, त्याच्यासाठी बायको ला खुश ठेवण्या व्यतिरिक्त कोणतंच काम अशक्य नव्हतं. राजा नं विचारलं, "कोणतं काम करावं लागेल महाराज?" "जा आणि एखाद्या सुखी माणसाचा सदरा (शर्ट )घेऊन ये " राजा निघाला वेषांतर करून. गावात गेला, ज्याला त्याला विचारत होता "तुम्ही सुखी आहात का? आणि जर असाल तर मला तुमचा सदरा द्...

मृत्यु

इमेज
  "मृत्यु" वर लिहायची किंवा वाचायची ही योग्य वेळ आहे का? खरं तर हिच वेळ योग्य आहे कारण मृत्यु हा असा अतिथी आहे जो तुम्हाला कधी कधी लिहायला किंवा वाचायला वेळच देत नाही. म्हणून तुम्ही "वाचाल" अशी अपेक्षा करतो. डॉ. शंतनू अभ्यंकर सरांचा "आपुले मरण पाहिले म्या डोळा" हा लेख वाचण्यात आला. कॅन्सर चं निदान झाल्यानंतर त्यांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक विश्वात कश्या घडामोडी झाल्यात आणि त्या सर्व घडामोडिंकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ह्याचं वर्णन करणारा लेख त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केला आहे. विशेष म्हणजे डॉ. अभ्यंकर हे एक विवेकवादी व्यक्ती आहेत. विवेकवादी आहेत अर्थातच ते नास्तिक आहेत. मरण हे अटळ आहे आणि प्रत्येक जण कधी ना कधी मरणारच ह्यावर आस्तिक आणि नास्तिक दोघांचही एकमत आहे. पण.. दोघांचा मृत्युंकडं बघण्याचा दृष्टिकोन अगदी भिन्न असतो. मृत्यु ची भीती ही निसर्गदत्त आहे. मृत्यु चं भय हे survival instinct वर आधारित असल्याने मृत्यु चं भय असणं हे नैसर्गिक आणि आवश्यक आहे. आस्तिक असो वा नास्तिक दोघंही इतर प्राण्यांप्रमाणेच ...