पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धीचा उच्चतम विकास

इमेज
आमच्या घरी देव्हाऱ्यात पंचवीस तीस विविध देवी देवतांच्या मुर्त्या होत्या. अन आमच्या घराशेजारी राहात असलेल्या बौद्ध घरी बुध्दाची मुर्ती होती. आई सांगायची, तो "त्यांचा" देव आहे, आपला नाही. आपण हिंदू आहोत आणि आपले शेजारी बौद्ध आहेत ह्याची जाणीव लहानपणी आपोआप होत गेली. माझ्या घरचं वातावरण धार्मिक नव्हतं. कट्टरता तर मुळीच नव्हती. परंतु आपले देव वेगळे, त्यांचा देव वेगळा अशी पुसटशी सीमारेषा जाणवायची. बुद्ध "आपला" देव नसल्याने त्याच्यात इंटरेस्ट घेण्याचं कारण नव्हतं. नंतर आयुर्वेद शिकताना आम्हाला दर्शनशास्त्राचा अभ्यास करावा लागला. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन अशी दोन शास्त्रे आपल्या भारतीय संस्कृतीत सन्मानाने अभ्यासली जातात हे माहित झालं. आम्हाला कोणताही एक टॉपिक निवडून त्यावर compilation बनवावं लागायचं. मी बौद्ध दर्शन निवडलं होतं. परंतु तो काळ इंटरनेटच्या सुरवातीचा असल्याने आणि आमच्यापाशी इंटरनेट उपलब्ध नसल्याने बौद्ध दर्शनाबद्दल रिसर्च कुठून आणि कसा करायचा ह्या पेचात पडलो. कॉलेजच्या ग्रंथालयात बौद्ध दर्शनावर काहीच साहित्य उपलब्ध नव्हतं. मग मी अकोल्यात एक दोन बौद्ध विहार...

शक्तिमान जयंती

इमेज
लहानपणी स्पायडरमॅन सुपरमॅन म्हणजे खरेखुरे कॅरेक्टर्स वाटायचे. नंतर हळूहळू कळायला लागलं ते काल्पनिक पात्र आहेत. काल्पनिक म्हटल्यावर मग श्रद्धेला स्थान उरत नाही. हातातून दोऱ्या काढून ह्या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारणं, किंवा पॅन्ट च्या वरून लाल चड्डी नेसून हवेत उडणं शक्य नसते हे विज्ञान शिकल्यावर कळायला लागलं. ज्या पात्रांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ऐतिहासिक किंवा पुरातात्विक पुरावेच उपलब्ध नाहीत आणि ज्यांच्या बद्दल सांगण्यात आलेल्या चमत्कारीक कथा बुद्धि तर्क आणि विवेकाला घोडा लावून निव्वळ मुर्ख मनोरंजन करण्यासाठी लिहिण्यात आल्या आहेत अश्यांना फार गंभीरतेने घ्यायचं नसतं. विज्ञान वाचा, इतिहास समजून घ्या, दुधात केलेली पाण्याची भेसळ कशी पकडायची असते त्याची वैज्ञानिक पद्धत शिकून घ्या. पुरातात्विक पुरावे (archeological evidences ) काय असतात, ऐतिहासिक घटनांचे आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या अस्तित्वाचे पुरावे कसे पडताळले जातात ह्याचं ज्ञान संपादन करा. अन्यथा.. काही वर्षांनी आणि स्पायडरमॅन पुण्यतिथी साठी वर्गणी मागायला तुमच्या दारात भक्तांच्या झुंडी उभ्या ठाकतील.. आणि म्हणतील "लिहा भाऊकड...

गर्व से कहो ?

इमेज
खुप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एकदा माझे पेशन्ट असलेले एक हिंदुत्ववादी काका मला हिंदुत्वाची महिमा सांगत बसले होते. आपला धर्म खतरे में हैं, आणि आता आपण एकजूट व्हायला हवं वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं, काका माझी गर्लफ्रेंड हिंदू आहे आणि मी पण हिंदूच आहे, पण तरीसुद्धा माझ्या जातीमुळे तिच्या घरचे आमच्या लग्नाला विरोध करतायत. तर तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही आणि तुमच्या हिंदुत्ववादी संघटनेचे सगळे कार्यकर्ते मिळून माझ्यासोबत माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी चला आणि तिच्या घरच्यांना समजावून सांगा की मुलगा मुलगी दोघेही हिंदूच आहेत तर लग्नाला विरोध का करता? माझी एवढी मदत कराल का काका? ह्यावर काका म्हणाले, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही ह्यात काही करु शकत नाही. एवढं बोलून काका निघून गेले, परत कधी हिंदुत्वाच्या विषयावर माझ्याशी बोललेच नाहीत. ∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«» आजचा विषय जरा गंभीर आहे. गेल्या दिवाळीतच लिहिणार होतो परंतु टाळलं. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी मला वॉट्सपवर एक फॉर्वर्डेड व्हिडीओ आला. त्या व्हिडिओत काही मुस्लिम लोकांचा जमाव एका हिंदू व्यक्तीला घेरून चोप देत होता. फेसबुकवर...

शेअर्ड सायकोटीक डिसॉर्डर

इमेज
अध्यात्म मार्गात असताना आमचा आठ दहा मित्रांचा एक ग्रुप बनला होता. आठवड्यातून एक दिवस तलावाकाठी आमची मिटिंग भरायची. त्या ग्रुपमधे हिंदू मुस्लिम असे मित्र आम्ही होतो. त्या ग्रुपमध्ये एकजण होता, तो सांगत असे कि त्याच्या घरी paranormal activities (भुताटकी ) होते. त्याच्या फॅमिलीत तो त्याची बायको आणि आई बाबा असे चार जण राहात होते. आणि त्या चौघासोबत एक अदृश्य भूतही त्यांच्या सोबत राहायचं म्हणे. मुस्लिम धर्मात त्याला जिन्न म्हणतात. त्या भुताचे आवाज त्या सर्वांना ऐकू यायचे, भास व्हायचे, बांगड्यांचे, भांड्यांचे आवाज रात्रीच्या वेळी ऐकू यायचे, लाईट्स आपोआप चालू बंद व्हायचे असं तो मित्र सांगत होता. कधी कधी तर ती पाचवी व्यक्ती त्यांच्यासोबत जेवायला बसायची म्हणे. त्यावेळी आम्हाला ते खरं वाटत होतं. कारण तो खोटं बोलत नाहीये ह्यावर आमचा विश्वास होता. पण आता जेव्हा मानसिक आजारांबद्दल सामान्य ज्ञान घ्यायचं म्हणून बराच अभ्यास केला तेव्हा माहित झालं कि ह्या मानसिक आजाराला Shared Psychotic Disorder (शेअर्ड सायकोटीक डिसॉर्डर ) असं म्हणतात. घरातल्या एका व्यक्तीला हा आजार होतो. पण ती व्यक्ती तिला होत असलेले भ...

श्री मेंढरं

इमेज
सत्संग म्हणा, बैठक म्हणा किंवा कोणताही धार्मिक /अध्यात्मिक गट (Cult )म्हणा, सर्वांची modus operandi एकसारखी असते. ह्या कल्टचा सर्वात वर एक म्होरक्या असतो जो प्रमुख मठाधीश /महाराज /स्वामी /बापु /श्री श्री ह्या सारख्या उपाधी घेऊन बसलेला असतो. ह्या म्होरक्याच्या वर आणखी एक "अदृश्य सत्ता" असल्याचा भास (illusion) तयार करण्यात येतो. त्या सर्वोच्च अदृश्य सत्तेशी ह्या म्होरक्याचा संपर्क स्थापित आहे आणि त्या सत्तेचा 'access' त्याच्यापाशी आहे असं चित्र उभं केलं जातं. त्या सर्वोच्च सत्तेशी तुम्हाला म्हणजे आपल्या सारख्या सामान्य माणसांना जुळायचं असेल तर ह्या मध्यस्थी असलेल्या म्होरक्याची कृपादृष्टी प्राप्त करावी लागेल असं अनुयायांच्या अंतर्मनात खोलवर रुजवल्या जातं. ह्यालाच "ब्रेनवॉश" असं म्हणतात. हा ब्रेनवॉश एका रात्रीतून होत नसतो करता येत नसतो. त्यासाठी अनुयायांच्या मनावर वारंवार ती गोष्ट हॅमर करत राहावी लागते. अगदी टीव्हीवरील जाहिराती सारखंच. संतूर साबण वापरल्याने वय माहित पडत नाही आणि तुम्ही तरुण सुंदर दिसायला लागता असं वारंवार सांगत राहिलं तर ते खरं वाटायला लागतं. ह...

देव... एक लोभस कल्पना

इमेज
अगदी उत्क्रांतीच्या सुरवातीच्या काळापासूनच कुतूहल (curiosity ) हा मानवी मेंदूचा आवडता विषय राहिला आहे. "हे काय आहे? हे असं का बरं आहे? हे असंच का बरं आहे?" असे प्रश्न मानवाला पडत आलेले आहेत. कुतूहल शमवणे आणि नव्या गोष्टींचा शोध घेणे ह्यात त्याला रोमांच मिळतो. पाऊस पडतो, विजा कडाडतात, भूकंप येतो, पूर येतो, चक्रीवादळ, ज्वालामुखी, गारपीट हा काय प्रकार आहे? हे प्रश्न मानवी मेंदूला हैराण करुन सोडायचे. तर्क विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या प्राथमिक आणि कच्च्या अवस्थेत असल्यामुळे त्याच्या त्या अपरिपक्व बुद्धीला जे पटेल ते अनुमान लावून त्यालाच सत्य मानणे अशी त्याची संशोधक वृत्ती होती. साथीचे आजार पसरायचे, माणसं पटापट मरायची, हे सगळं होण्यामागे कसलातरी व्हायरस असावा हे त्याच्या अविकसित मेंदूच्या आकलना बाहेरची गोष्ट होती. जे डोळ्यांनी दिसत नाही, ते बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकयंत्र उपलब्ध नव्हते. मग हे सगळं घडून येण्यामागे कसलीतरी अदृश्य शक्ती कार्यरत असावी असा कयास त्याच्या मेंदूनी बांधला. काळेकुट्ट ढग, त्याआडून लखलखणाऱ्या वीजा, मुसळधार कोसळणारा पाऊस, सुसाट सुटलेला वारा आणि तुडुंब भरून...

कल्ट

इमेज
25 एप्रिल 2023 रोजी केन्या नावाच्या देशात जमिनीत पुरलेले 89 मृतदेह पोलिसांना सापडले. विशेष म्हणजे ह्या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केल्या होत्या. कशासाठी? तर येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी. हे सर्वजण मालिंदी कल्ट चे सदस्य होते. Cult (कल्ट) म्हणजे धार्मिक /अध्यात्मिक उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या समान श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांचा समूह. ह्या cults चा एक गुरु असतो ज्यानं दिलेली प्रत्येक आज्ञा डोळे झाकून आणि कोणतीही शंका न ठेवता पाळणं हे त्या कल्टच्या सदस्यांचं कर्तव्य असतं. ह्या मालिंदी कल्टचा गुरु होता पॉल माकेंझी. ह्या पॉल माकेंझी आणि त्याच्या बायकोने मिळून 2003 मधे हा कल्ट सुरु केला होता. त्यानं आपल्या अनुयायांना असं पटवून सांगितलं होतं की जर तुम्ही अन्नत्याग करुन जीव द्याल तर मेल्यानंतर तुम्हाला थेट स्वर्गात येशू ख्रिस्ताशी भेटता येईल आणि त्याच्यासोबत राहता येईल. देवभोळ्या आणि स्वतःला पुण्यवान बनवण्याचं भूत डोक्यावर चढलेल्या ह्या मूढ लोकांना आपल्या गुरुचं म्हणणं पटलं आणि त्यांनी त्याची आज्ञा पाळली. 89 मृतदेह सापडलेत आणि 200 जण बेपत्ता आहेत. ह्यापूर्वीही अश्या अनेक घटना घडल्या आहेत. 2...

बुद्धीचा उच्चतम विकास

इमेज
आमच्या घरी देव्हाऱ्यात पंचवीस तीस विविध देवी देवतांच्या मुर्त्या होत्या. अन आमच्या घराशेजारी राहात असलेल्या बौद्ध घरी बुध्दाची मुर्ती होती. आई सांगायची, तो "त्यांचा" देव आहे, आपला नाही. आपण हिंदू आहोत आणि आपले शेजारी बौद्ध आहेत ह्याची जाणीव लहानपणी आपोआप होत गेली. माझ्या घरचं वातावरण धार्मिक नव्हतं. कट्टरता तर मुळीच नव्हती. परंतु आपले देव वेगळे, त्यांचा देव वेगळा अशी पुसटशी सीमारेषा जाणवायची. बुद्ध "आपला" देव नसल्याने त्याच्यात इंटरेस्ट घेण्याचं कारण नव्हतं. नंतर आयुर्वेद शिकताना आम्हाला दर्शनशास्त्राचा अभ्यास करावा लागला. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन अशी दोन शास्त्रे आपल्या भारतीय संस्कृतीत सन्मानाने अभ्यासली जातात हे माहित झालं. आम्हाला कोणताही एक टॉपिक निवडून त्यावर compilation बनवावं लागायचं. मी बौद्ध दर्शन निवडलं होतं. परंतु तो काळ इंटरनेटच्या सुरवातीचा असल्याने आणि आमच्यापाशी इंटरनेट उपलब्ध नसल्याने बौद्ध दर्शनाबद्दल रिसर्च कुठून आणि कसा करायचा ह्या पेचात पडलो. कॉलेजच्या ग्रंथालयात बौद्ध दर्शनावर काहीच साहित्य उपलब्ध नव्हतं. मग मी अकोल्यात एक दोन बौद्ध विहार...