शक्तिमान जयंती
लहानपणी स्पायडरमॅन सुपरमॅन म्हणजे खरेखुरे कॅरेक्टर्स वाटायचे. नंतर हळूहळू कळायला लागलं ते काल्पनिक पात्र आहेत. काल्पनिक म्हटल्यावर मग श्रद्धेला स्थान उरत नाही.
हातातून दोऱ्या काढून ह्या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारणं, किंवा पॅन्ट च्या वरून लाल चड्डी नेसून हवेत उडणं शक्य नसते हे विज्ञान शिकल्यावर कळायला लागलं.
विज्ञान वाचा, इतिहास समजून घ्या, दुधात केलेली पाण्याची भेसळ कशी पकडायची असते त्याची वैज्ञानिक पद्धत शिकून घ्या. पुरातात्विक पुरावे (archeological evidences ) काय असतात, ऐतिहासिक घटनांचे आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या अस्तित्वाचे पुरावे कसे पडताळले जातात ह्याचं ज्ञान संपादन करा.
अन्यथा..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा