पोस्ट्स

Featured Posts

 नमस्ते दोस्तों,  मेरा नाम डॉक्टर विजय हैं और मैं एक नास्तिक (निरीश्वरवादी) हूँ. नास्तिक अर्थात ऐसा व्यक्ति जो ईश्वर ,अल्लाह, गॉड या किसी भी तरह की पारलौकिक शक्ति में विश्वास नहीं रखता।   लेकिन क्या मैं  शुरू से ही नास्तिक था ? नहीं , बिलकुल नहीं!  मैं बचपन से लेकर उम्र के पैंतीस साल तक बहुत ही धार्मिक और श्रद्धालु व्यक्ति था. मेरी ईश्वर के प्रति श्रद्धा और भक्ति अपार थी।  मेरी भक्ति एक आम इंसान की तरह केवल भौतिक मनोकामनाए पूरी करने के लिए नहीं थी, बल्कि ईश्वर का साक्षात्कार करके मोक्ष प्राप्त कर जीवन का कल्याण करने की तीव्र इच्छा से प्रेरित थी।  ईश्वर से मिलना, उनके दर्शन करना, और स्वयं को ईश्वर स्वरुप जानना यहीं मेरे जीवन का एकमात्र लक्ष्य बन चूका था।  इस परमलक्ष्य को प्राप्त करने के लिए मैं अपना जीवन समर्पित कर चूका था. लेकिन फिर ऐसा क्या हुआ जो आज मैं अपने आपको नास्तिक घोषित करता हूँ? इसी विषय पर आज मैं बात करनेवाला हूँ।   मेरी नास्तिकता ईश्वर से नाराजगी वाली नास्तिकता नहीं है. फिल्मों में आपने ऐसे किरदार देखे होंगे जो  किसी कारण ईश्वर से नाराज हैं और उसी वजह से नास्तिक बन जाते है।

"How To Become A Cult Leader"

इमेज
  "How To Become A Cult Leader" नेटफ्लिक्सवर 6 एपिसोड्सची ही डॉक्युमेंटरी सिरीज आहे. बघण्यासारखी आहे. जगातल्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त वादग्रस्त कल्ट्स बद्दल माहिती दिलेली आहे. Charles Manson, Jim Jones, Shoko Asahara, Jaime Gomez इत्यादी विदेशी कल्ट लीडर्स आणि रजनीश ओशो, नित्यानंद, इस्कॉन इत्यादी भारतीय कल्ट्स बद्दलही उहापोह करण्यात आला आहे. कल्ट (Cult ) चा अर्थ होतो कसल्यातरी उदात्त भासणाऱ्या परंतु विचित्र आणि अतर्क्य अश्या उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या माणसांचा समूह. अश्या समूहाचा एक म्होरक्या (लीडर / गुरु ) असतो. ह्या म्होरक्याच्या प्रत्येक आदेशाचं अनुपालन करण्यासाठी हा समूह वचनबद्ध असतो. मग ते आदेश बुद्धीला न पटणारे, तर्कात न बसणारे अन बरेचदा तर विक्षिप्त असेही असले तरी ते पालन करण्यासाठी ते अनुयायी कटीबद्ध असतात. कल्ट लीडरचा रोल असतो आपल्या अनुयायांना सतत निरनिराळ्या आज्ञा देऊन त्यांच्याकडून अनुपालन करवून घेणे. ह्या आज्ञा सहसा त्याच्या कल्टचा विस्तार करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासंबंधी असतात. अनुयायांचा रोल असतो आपल्या लीडरने दिलेला आदेश सर्वतोपरी मानून

माझे मृत्युपत्र.

इमेज
एप्रिल 2021 मधे माझ्या आईचा मृत्यु झाला. मृत्यु गवर्नमेंटच्या को*विड वॉर्डात झाल्याने मृतदेह घरी घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. थेट स्मशान घाटात तेही सरकारी वाहनातून मृतदेह सामूहिकरित्या नेल्या जात होते. एप्रिल महिन्यात मृत्यूचा तांडव सुरु होता.. स्मशानातही रांगा लागल्या होत्या. कोणतेही अंत्यविधी करण्याची परवानगी नव्हती. पण माणुसकीच्या नात्याने तिथले कर्मचारी मृतदेहाला स्पर्श करु न देता जवळच्या दोन कुटुंबियांना पुष्प वगैरे अर्पण करुन अग्नी देण्याची मुभा देत होते. त्याआधी तर कित्येक मृतदेह सरकारी यंत्रणेमार्फतच दहन करण्यात आले होते. कुटुंबियांना अंतिम दर्शनसुद्धा घेता आले नाहीत. त्या अवधीत मरण पावलेल्या लोकांना कोणतेही पारंपारिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने उरकता आले नाहीत. तिथून अकरा महिन्यांनी माझ्या भावाने अक्करमास वगैरे विधी पुरोहिताकडून करुन घेतलेत. मी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. परंतु आपल्या आईप्रति आदर आणि भाऊ बहिणीचं मन ठेवण्यासाठी म्हणून थोडा वेळ त्यांच्यात शामिल झालो. तिथंही बोलावण्यात आलेले दोन्ही पुरोहित पूजेच्या मधातच ब्रेक घेऊन परधर्मद्वेषयुक्त चर्चा उकरून काढत होते अन आ

आपण_सारे_असुर

इमेज
#रिव्हर्स_स्पिरिचुअलिटी "असुर" वेब सिरीज छान आहे. ह्या सायकोलॉजिकल थ्रीलर मधे मानवी स्वभावाचे सर्व पैलु उलगडून दाखवण्यात आले आहेत. नैतिकता, धर्म, क्षमाशिलता, प्रेम, करुणा, परोपकार, सहिष्णूता ही पवित्र आणि धार्मिक मानली जाणारी मूल्ये खरंतर आपणा सर्वांच्या आत खोलवर दडून बसलेल्या राक्षसी चेहऱ्याला लपवण्यासाठी वरून लावलेले मुखोटे आहेत आणि जेव्हा तुमच्या ह्या खोट्या मूल्यांच्या अहंकाराला डिवचलं जातं तेव्हा हे सगळे मुखोटे गळून पडतात आणि तुमचा राक्षसी चेहरा प्रकट होतो, ही या वेबसिरीजची theme आहे. अध्यात्म म्हणतं की तुमचं मूळ अस्तित्व हे ईश्वरीय असून तुम्ही निर्मळ पवित्र प्रेममय आत्मस्वरूप आहात. आणि अहंकारवश तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडून तुम्ही अपवित्र आचरण करत असता. आणि असुरचं रिव्हर्स अध्यात्म असं म्हणतं की तुमचं मूळ अस्तित्व हे राक्षसी असून तुम्ही हिंसक अपवित्र आणि द्वेषमूलक आहात. पण हे तुमचं असली स्वरूप लपवण्यासाठी तुम्ही पवित्रता आणि चांगुलपणाचा आव आणत असता. अध्यात्माच्या सर्वमान्य विधानांना उलटं टांगून त्यांची चिरफाड करण्यात आली आहे. आणि सत्य नेमकं ह्याच्या विपरीत

फार भी दिल है हिंदुस्थानी

इमेज
  एक मित्र भेटायला आला. म्हणे, तु अध्यात्मात इतकी वर्षे घालवूनही आता त्यावरच टीका करतोस. आसारामसारख्या बुवांना शिव्या घालतोस ते ठीक आहे, पण सगळेच वाईट नसतात रे. मी म्हटलं, एखादं उदाहरण दे जो ह्या क्षेत्रात धुतल्या तांदळाचा आहे. तो बोलला, आचार्य प्रशांत बद्दल तुझं काय मत आहे? तो किती छान गोष्टी सांगतो, वेद उपनिषद सारख्या क्लिष्ट गोष्टी सोप्या करुन सांगतो. भक्ती ज्ञान आणि कर्मयोग सोप्या भाषेत समजावतो. मी म्हटलं, आचार्य प्रशांत बद्दल बोलण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगतो ती नीट ऐक. मग आचार्य प्रशांत बद्दल बोलूयात. एका गावात एक व्यापारी होता. त्याच्या घरी एक म्हैस होती. म्हशीचं दूध तो स्वतः प्यायचा. पण शेणाचं काय करायचं हा प्रश्न त्याला पडायचा. त्याला एक युक्ती सुचली. शेणाला वेगवेगळे आकार देऊन तो खेळणी म्हणून विकू लागला. आपल्या मार्केटिंग स्किल्स वापरून तो गावभर खेळणी विकू लागला. काही वर्ष जोरात चालला त्याचा धंदा. पण शेणाची खेळणी लवकर तुटफूट व्हायची शिवाय आता मार्केट मधे लाकडाची धातूची टिकाऊ खेळणी आली त्यामुळे काही वर्षांनी धंदा मंदावला. व्यापाऱ्याच्या मुलाने मग नवीन शक्कल लढवली. शेणापासून तय

दूर के ढोल सुहाने लगे.

इमेज
  दूर के ढोल सुहाने लगे. जे लांब आहे त्याची ओढ अधिक असते. जे जवळ आहे त्याबद्दल ओढ किंवा आकर्षण कमी होत जातं. हा मानवी स्वभाव आहे. मी पहिल्यांदा ऋषिकेशला गेलो होतो तेव्हा वाटलं होतं किती नशीबवान असतील ना इथले रहिवासी. ऋषिकेश सारख्या पवित्र जागी त्यांचं घर आहे. आपण किती लांबून येतो इथं दर्शनाला. ह्यांचं बरं आहे, रोजच तीर्थयात्रा घडते ह्यांना. पण प्रत्यक्षात मात्र तिथं राहणाऱ्या लोकांना त्यात काही थोर वाटत नाही. त्यांना ऋषिकेश व्यतिरिक्त इतर देवस्थानावर जाऊन दर्शन घ्यायची इच्छा असते. "जागृत" देवस्थानावर बाहेरून लांबून येणाऱ्यांचीच संख्या अधिक असते नेहमी. लोकल लोकं क्वचितच त्या मंदिरात जात असतील. जे प्राप्त आहे त्यातून अपेक्षाभंग झाला म्हणजे मग अप्राप्याची ओढ लागते. अप्राप्य गोष्टी जास्त आकर्षक वाटतात. जिथं पेशन्टची गर्दी असते तो डॉक्टर चांगला, जिथं ग्राहकांची रांग असते ते हॉटेल चांगलं, जिथं भक्तांची रेटारेटी जास्त असते तो देव जागृत असं लोकमत असतं. हॉटेलात कितीही घाण असो, पदार्थ कितीही बेचव असो, पण "क्राऊड" आहे म्हणजे ते चांगलंच असणार अशी भावना असते. "इतके सगळे लोक

sunc cost fallacy

इमेज
  तुम्ही लाख रुपये खर्च करुन एक मशीन विकत घेऊन येता. ती मशीन कपडे धुवून देईल, भांडे घासून देईल, स्वयंपाक करुन देईल अशी जाहिरात तुम्ही बघितलेली असते. मोठ्या थाटामाटात तुम्ही मशीन घरी आणता. पण, जेव्हा तुम्ही तिला ऑन करता तेव्हा ती एकही काम करत नाही. मग तुम्ही कंपनीला तक्रार करता. कंपनी म्हणते मशीनला काम करण्यासाठी एक सॉफ्टवेअर अपग्रेड मारावा लागेल. त्यासाठी 25 हजार रुपये खर्च येईल. तुम्ही ऑलरेडी एक लाख खर्च केलेले असतात. त्यामुळे आता 25 हजार अधिक खर्च करायला काय हरकत आहे म्हणून तुम्ही 25 हजार रुपये आणखी देता. पण तरीही मशीन काम करत नाही. तुम्ही परत कंपनीला तक्रार करता. कंपनी म्हणते तुम्हाला मशीनसाठी एक सपोर्टिव्ह एसेसरी विकत घ्यावी लागेल त्याशिवाय मशीन काम करणार नाही. तुम्ही परत 10 हजार खर्च करता आणि ती accessory घेऊन येता. पण मशीन तरीही काम करत नाही. पण तुम्ही आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार इन्व्हेस्ट केलेले असल्यामुळे ते पैसे वाया जाऊ नयेत म्हणून कंपनी जे जे सांगेल ते करत जाता. तुमची फसवणूक झालीये हे लक्षात येऊनही तुम्ही कंपनीच्या आज्ञा पाळत जाता. कारण तुमचे पैसे वाया जातील ही भीती असते.