आयुष्याचं कस्टमर केअर सेंटर
गरीब अशिक्षित वर्गातल्या बायकांच्या "अंगात" येतं. सुशिक्षित पैसेवाल्या बायकांना "अवेकनिंग एक्सपीरीयन्स" होत असतात
मुळात आहेत दोन्ही मानसिक विकृतीच.
जीवनातल्या समस्यांचं समाधान चुकीच्या ठिकाणी शोधायला गेलात तर तुमची लुबाडणूकच होईल.
फॅमिली रिलेशनशिप प्रॉब्लम्स, हेल्थ प्रॉब्लम्स,करिअर मुळे येणारा स्ट्रेस ह्यामुळे आलेली निराशा माणसाला पर्मनंट सोल्युशन्स च्या शोधात भटकायला भाग पाडते. हे तथाकथित "पर्मनंट" सोल्युशन देण्याचा दावा अध्यात्माच्या आडून केला जातो. "अवेकनिंग" "डिवाईन ब्लीस" "एनर्जी हीलिंग" इत्यादी फॅन्सी नावाने हा गोरखधंदा चालतो. ह्याला बळी पडतात सुशिक्षित वर्गातली माणसं. (ह्यात महिलांचं प्रमाण अधिक )
असं असलं तरीही तिथं उपस्थित सगळेच्या सगळेच काही परमेश्वराच्या शोधात आलेले नसतात. बहुतांशी भुरटेच असतात. भारतीय संस्कृतीचे बळी ठरलेले, सेक्स बद्दल मनात कुंठा असलेले, विदेशी बायकांबद्दल कमालीचं आकर्षण असलेले, व्याभिचार तर करायचा परंतु तो धार्मिक वातावरणात करायचा हेतू घेऊन आलेले पापभीरू पुरुष इथं लुंगाळत असतात. अश्या "OYO" छाप पुरुषांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना प्रलोभन दाखवत मग असे भुरटे गुरु दुकानं मांडून बसतात.
म्हणून योग्य ठिकाणी समाधान शोधा. मनोविकारतज्ञ, समुपदेशक ह्यांची मदत घ्या. हे असे शक्तिपात वगैरे उपचार करुन घेऊ नका. ह्याने मानसिक विकृती वाढत जातात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा