पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 नमस्ते दोस्तों,  मेरा नाम डॉक्टर विजय हैं और मैं एक नास्तिक (निरीश्वरवादी) हूँ. नास्तिक अर्थात ऐसा व्यक्ति जो ईश्वर ,अल्लाह, गॉड या किसी भी तरह की पारलौकिक शक्ति में विश्वास नहीं रखता।   लेकिन क्या मैं  शुरू से ही नास्तिक था ? नहीं , बिलकुल नहीं!  मैं बचपन से लेकर उम्र के पैंतीस साल तक बहुत ही धार्मिक और श्रद्धालु व्यक्ति था. मेरी ईश्वर के प्रति श्रद्धा और भक्ति अपार थी।  मेरी भक्ति एक आम इंसान की तरह केवल भौतिक मनोकामनाए पूरी करने के लिए नहीं थी, बल्कि ईश्वर का साक्षात्कार करके मोक्ष प्राप्त कर जीवन का कल्याण करने की तीव्र इच्छा से प्रेरित थी।  ईश्वर से मिलना, उनके दर्शन करना, और स्वयं को ईश्वर स्वरुप जानना यहीं मेरे जीवन का एकमात्र लक्ष्य बन चूका था।  इस परमलक्ष्य को प्राप्त करने के लिए मैं अपना जीवन समर्पित कर चूका था. लेकिन फिर ऐसा क्या हुआ जो आज मैं अपने आपको नास्तिक घोषित करता हूँ? इसी विषय पर आज मैं बात करनेवाला हूँ।   मेरी नास्तिकता ईश्वर से नाराजगी वाली नास्तिकता नहीं है. फिल्मों में आपने ऐसे किरदार देखे होंगे जो  किस...

"How To Become A Cult Leader"

इमेज
  "How To Become A Cult Leader" नेटफ्लिक्सवर 6 एपिसोड्सची ही डॉक्युमेंटरी सिरीज आहे. बघण्यासारखी आहे. जगातल्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त वादग्रस्त कल्ट्स बद्दल माहिती दिलेली आहे. Charles Manson, Jim Jones, Shoko Asahara, Jaime Gomez इत्यादी विदेशी कल्ट लीडर्स आणि रजनीश ओशो, नित्यानंद, इस्कॉन इत्यादी भारतीय कल्ट्स बद्दलही उहापोह करण्यात आला आहे. कल्ट (Cult ) चा अर्थ होतो कसल्यातरी उदात्त भासणाऱ्या परंतु विचित्र आणि अतर्क्य अश्या उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या माणसांचा समूह. अश्या समूहाचा एक म्होरक्या (लीडर / गुरु ) असतो. ह्या म्होरक्याच्या प्रत्येक आदेशाचं अनुपालन करण्यासाठी हा समूह वचनबद्ध असतो. मग ते आदेश बुद्धीला न पटणारे, तर्कात न बसणारे अन बरेचदा तर विक्षिप्त असेही असले तरी ते पालन करण्यासाठी ते अनुयायी कटीबद्ध असतात. कल्ट लीडरचा रोल असतो आपल्या अनुयायांना सतत निरनिराळ्या आज्ञा देऊन त्यांच्याकडून अनुपालन करवून घेणे. ह्या आज्ञा सहसा त्याच्या कल्टचा विस्तार करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासंबंधी असतात. अनुयायांचा रोल असतो आपल्या लीडरने दिलेला आदेश सर्वतोपरी मानून...

माझे मृत्युपत्र.

इमेज
एप्रिल 2021 मधे माझ्या आईचा मृत्यु झाला. मृत्यु गवर्नमेंटच्या को*विड वॉर्डात झाल्याने मृतदेह घरी घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. थेट स्मशान घाटात तेही सरकारी वाहनातून मृतदेह सामूहिकरित्या नेल्या जात होते. एप्रिल महिन्यात मृत्यूचा तांडव सुरु होता.. स्मशानातही रांगा लागल्या होत्या. कोणतेही अंत्यविधी करण्याची परवानगी नव्हती. पण माणुसकीच्या नात्याने तिथले कर्मचारी मृतदेहाला स्पर्श करु न देता जवळच्या दोन कुटुंबियांना पुष्प वगैरे अर्पण करुन अग्नी देण्याची मुभा देत होते. त्याआधी तर कित्येक मृतदेह सरकारी यंत्रणेमार्फतच दहन करण्यात आले होते. कुटुंबियांना अंतिम दर्शनसुद्धा घेता आले नाहीत. त्या अवधीत मरण पावलेल्या लोकांना कोणतेही पारंपारिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने उरकता आले नाहीत. तिथून अकरा महिन्यांनी माझ्या भावाने अक्करमास वगैरे विधी पुरोहिताकडून करुन घेतलेत. मी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. परंतु आपल्या आईप्रति आदर आणि भाऊ बहिणीचं मन ठेवण्यासाठी म्हणून थोडा वेळ त्यांच्यात शामिल झालो. तिथंही बोलावण्यात आलेले दोन्ही पुरोहित पूजेच्या मधातच ब्रेक घेऊन परधर्मद्वेषयुक्त चर्चा उकरून काढत होते अन आ...