Ⓔ︎Ⓟ︎Ⓘ︎Ⓒ︎Ⓤ︎Ⓡ︎Ⓔ︎Ⓐ︎Ⓝ︎ Ⓟ︎Ⓐ︎Ⓡ︎Ⓐ︎Ⓓ︎Ⓞ︎Ⓧ︎
आजचा लेख लांबलचक आहे. पण माझे बुद्धिवादी वाचकमित्र नक्कीच वाचतील ह्याची मला खात्री आहे म्हणून हा विषय जरा अघळ पघळ घेऊन लिहिला आहे. लहानपणी आम्ही गरीबी काय असते ते जवळून बघितलं आहे, भोगलं आहे. आजोळी जायचो तेव्हा एका चुलत आजीकडे भेटायला म्हणून जात होतो. ती जख्ख म्हातारी एका दहा बाय दहा च्या खोलीत आपल्या कुटुंबासहित राहायची. त्या इवल्याश्या खोलीत पाच सहा जणांचं कुटुंब राहात होतं. वस्तु कशाबशा एकावर एक रचलेल्या कोंबलेल्या. एका कोपऱ्यात स्वयंपाक, एका कोपऱ्यात न्हानीघर म्हणून नुसताच एक पडदा लावलेला. जेवणं झोपणं सगळं त्या खुराडावजा झोपड्यात. असं असूनही एक कोपरा मात्र देवघरासाठी राखीव ठेवलेला होता. तोही प्रशस्त. देवघरात पंचवीस तीस मुर्त्या. नीट स्वच्छता ठेऊन पुजापाठ केलेला. फूल दिवा अगरबत्ती अन नैवेद्य ठेवलेला. मला ते भारी वाटलं. त्या आज्जी खुप प्रेमळ होत्या. गरीब असूनही आम्हाला पाहुणचार करायच्या. त्यांच्या घरी दरवर्षी महालक्ष्मी स्थापना व्हायची. महालक्ष्म्यांचं खुप करावं लागतं. खर्चिक काम असतं. म्हणून मला आठवतं माझे बाबा दरवर्षी त्या आज्जीला मनी ऑर्डर करुन आर्थिक मदत करायचे. मला त्या आज्जीचं ...